‘वाडा चिरेबंदी’, 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' "नाट्यत्रयी"..!!
एका नितांतसुंदर आणि अभिजात कलाकृतीचा साक्षीदार आणि रंगमंचीय आस्वाद म्हणजे काय ?
याचा हा परिपूर्ण अनुभव.

वाडा चिरेबंदी’, 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ही "नाट्यत्रयी" वा "त्रिनाट्यधारा" याची देही...पाहण्याचा योग मित्रद्वयी श्री सुनीलदत्त कुलकर्णी आणि श्री प्रसाद चोथवे यांच्यामुळे आला.

'जिगिषा' आणि 'अष्टविनायक' या नाटय़संस्था..आणि
चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेले दिग्दर्शन....वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, निवेदिका जोशी-सराफ, नेहा जोशी...यांचे एका पेक्षा एक सरस साभिनय सादरीकरण..!!

सलग तीन प्रयोग पाहून
भारावलेले..सुन्न..रिते..मन..
काळाचा महिमा..
आणि अशी..बरीचशी...
भावनिक गुंतागुंत..
....
थेट काळजाला..भिडणारा हा नाट्यविष्कार..!!

सिद्धहस्त लेखक श्री महेश एलकुंचवार यांच्या मनामध्ये  "उध्वस्त होणारी एकत्रित कुटुंब व्यवस्था, पोकळ अभिमान आणि ओस पडणारी खेडी" हे किती खोलवर रुजले असेल ? हा प्रश्न शेवटपर्यंत सतावत राहतो.

तीन पिढ्यांचा लेखाजोखा मांडताना एक ही छोटी-मोठी "गोष्ट" त्यांचा लेखनातून सुटलेली नाही.

जगण्यातील निरर्थकता आणि आयुष्याच्या एका क्षणाला येणारे रितेपण हे फार संवेदशीलतेने लेखनाने लिहिले आहे आणि चंकू यांनी ते प्रयोगात उभे केले आहे.

एक नाट्य रसिकाला यापेक्षा आणखी काय हवे असते..?

-©डॉ गणेश मुडेगावकर.

Share