राजकीय संघर्ष, राजकारणातील नाती कि नात्यांचे राजकारण, 

स्त्री अस्मिता आणि आदर्शवाद की व्यवहार...?

अस्मिता आणि आदर्शवाद की व्यवहार यांचे सूंदर अविष्कार असणारे नाटक म्हणजे "अग्निकन्या"

55 राज्य नाट्य स्पर्धेमधे प्रा. रा.द. अरगडे लिखित आणि अमोल अरगड़े दिग्दर्शित  प्रयोग नुकताच सादर झाला.

ज्वलंत विषय , उत्तम सादरिकरण आणि सर्वच पात्रांचा नितांत सुन्दर अभिनय यामुळे "अग्निकन्या" खऱ्या अर्थाने प्रेकक्षकांपर्यन्त पोहोचले. मानजीराव ( मुरलीधर फड़) , ज्ञानदास (अमोल अरगड़े),  मोहिनी ( रूपाली भोकरे ) डॉ गिरीश ( संकेत काटे) आणि महादू ( कुलकर्णी) यांनी आपापल्या भूमिकांमधे प्राण ओतला.

राजकारणी व्यकिला नाते आणि राजकारण यातील गुंता न सोडवता आल्यास नक्की काय होते? याचे नेमके चित्र अगदी बेमालुपने मुरलीधर फड़ यांनी उभे केले.
लेखकाची नेमकी वैचारिक आणि तात्विक बैठक ज्ञानदास या पात्रामार्फ़त आपणापर्यंत पोहोचते. अमोल अरगड़े यांनी ही भूमिका खऱ्या अर्थाने जगली आहे.
मोहिनी जी या नाटकामधे रूपाली भोकरे यांनी साकारली जी "स्त्री" "मुलगी" "राजकारणाची" उत्तम जाण असणारी मुस्सदि, आणि अन्तिमतः "अग्निकन्या " हा प्रवास अगदी छान रीतीने मांडला आहे.
साधना ही भूमिका रंगवताना रोहिणी पाठक यांनी स्त्री मुक्ति चळवळ , महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि एक व्यवहारी स्त्री असे अनेक कंगोरे नेमकेपणे साधुन "साधना" ही भूमिका साकारली आहे.
डॉ गिरीश संकेत काटे यांनी उत्तमच सादर केला आणि महादू हा जान सामन्यांच्या प्रतिनिधि आणि नोकर मस्तपणे विनोदी शैलीने पोहचवला. या नाटक चे वेशिष्टय हेच की " चर्चा नाट्य" असून देखील अत्यन्त नेमके आणि उत्तम दिग्दर्शित केल्यामुळे या संहितेला चार चाँद लागले आहेत.
सचिन भोकरे यांनी तर नेपथ्यामधे अक्षरशः जादुच केली आहे. अवघ्या 20 सेकंदामधे पूर्ण "सेट" बदलने ही अदभुत कल्पना सत्यात ऊतरवली आहे. परीक्षक सुद्धा या कल्पनेस दाद देऊन गेले. अमित अरगड़े यांनी नाटकाचा नेमका मूड लक्षात घेऊन अत्यंत छान संगीत दिले.
डॉ गणेश मुड़ेगावकर यांनी " अग्निकन्याची " वेगवेगळी रुपे प्रकाश योजनेच्या साह्याने रंगमंचावर उभी केली.
सुनीलदत्त कुलकर्णी यांची रंगभूषा, शिरीष राखे यांची रंगमंच व्यव्स्था नेमकी होती सर्वच टीमने मागील 3-4 महिनयांची मेहनत खऱ्या अर्थाने या प्रयोगामार्फत सर्वांपर्यंत पोहचवली...!!

सर्व टीम चे अभिनंदन...!!

Share