#स्पर्धा_पाहिलेला_माणूस
नाटक (3): ऍनिमल प्लॅनेट
लेखक : किरण येले

'मनुष्यप्राणी' की 'माणूस' ?

उन्मळून पडणे म्हणजे काय.........?
'वर्तमान' काळाच्या गर्तेत लोटलेलेला, ओरबडलेला आणि 'भविष्यकाळ'
मिट्ट काळोख..!!

कोण निर्माण करत ही अवस्था ?
पशू, माणूस की मानवातील पशू ?
ही सुसंस्कृत माणस अशी जनावरांसारखी का वागतात ?
हे आणि असे असंख्य प्रश्न..!!!

कुणीतरी.....
कधीतरी.....
आपल्याला हा प्रश्न विचारतोच ना ?

जर ही वेळ तुझ्यावर आली असती तर ?

तुझ्या डोळ्यासमोर जर तुझं सर्वस्व नेस्तनाबूत होत असेल तर....
आणि हे सर्व घडत असताना तुम्ही हतबल असला तर..!!

तर...!!

तर काय...?

....उरते एक....
निर्विकार पोकळी........
सुन्न.....बधीर...मरणासन्न........
झालेलं मन......हेलावून सोडणारी..........
भीतीदायक हतबलता....शांतता...........
....
आपल्या डोळ्यासमोर चिरडले गेलेलं स्वत्व.........................
बेचिराख झालेली स्वप्न..... आणि एक....उघड नागड....भयाण... सत्य..!!

'अत्याचार' हा एकदाच होतो पण त्यानंतर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनी तो वारंवार अनुभवा लागतो.....अगणित वेळा....…...

..........त्यानंतर या वास्तवाचा स्वीकार हा अवघड का होत असेल ?
त्या पीडितेस वास्तवाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य का मिळत नसेल ?
उत्तर एकच
.....निर्माण झालेले...नव्हे...निर्माण केलेले प्रश्न...
किंवा कदाचित...
"मरणाने केली सुटका.....जगण्याने छळले होते..!" अशी प्रबळ होत जाणारी भावना..!!

कथासूत्र:
तुमच्या डोळ्यासमोर जर तुमच्या प्रेयसीवर अत्याचार झाला तर ?
तुमच्यासमोर तिचं सर्वस्व ओरबाडल जात असेल आणि तुम्ही काहीच करू शकत नसाल तर..?
या प्रसंगानंतर सुरू होतो तो एका वेदनेचा प्रवास...
ती पूर्णतः उध्वस्त झालेली..
मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचलेली..
प्रत्येक "पुरुष" हा तिच्याच शोधात आहे आणि..... कधीही...कदाचित...परत ...........

'ती' आता पराकोटीची सावध झालीय.....स्वसंरक्षणासाठी ती आता शस्त्र बाळगू लागलीय... मानसिक द्वंद्व सुरू आहेच... त्यामुळे हल्यास ही तयार असणारी ती...विमनस्क..!!

'तो'...कोलमडून पडलाय..सावरतोय स्वतःला..आणि तिला...झुंज देऊ पाहतोय...स्वतःशी....आणि समाजाशी..!!
पण हा लढा एकाकी आणि एकांगी ठरतोय....कुठेतरी आपल्या हतबलतेच शल्य टोचतय..!!

यानंतर सुरू टोकदार संघर्ष....'तिचा' आणि 'त्याचा'..!! ती प्रत्येक पुरुषाचा जीव घेण्यासाठी धडपडतेय तर तो उद्विग्न... आणि 'त्यांना' मारण्यासाठी तयार.

माणूस हा "मनुष्य प्राणी" कसा ? हे उलगडण्यासाठी, कदाचित अनुभवण्यासाठी हे एनिमल प्लॅनेट...!!
जंगलातील पशूंचे सुद्धा काही 'नियम' असतात हे 'मनुष्यप्राण्यास' समजू नये..?
पुरुषाच 'पुरुषपण' आणि 'पुरुषार्थ' यातील मूलभूत फरक तो काय ?

स्त्रीच 'स्त्रीत्व' म्हणजे नेमकं काय ?
अडचणीत सापडलेली स्त्री ही संधी की जबाबदारी ?
याचा शोध घेत संवेदना सुन्न करणारी ही नाट्य कृती....!!

या नाटकातही 'ती' आणि 'तो' अक्षरशः या भूमिका जगले आहेत..!! तिचा प्रत्येक पुरुषावरचा पराकोटीचा संशय, राग आणि त्याची होणारी भावणीक घुसमट आपणास शेवटपर्यंत अस्वस्थ करून टाकते.

या अस्वस्थतेला, मानवी पशुत्वाला..उत्तर एकच...फाशी..हे कदाचित सर्वमान्य नसेल.....पण भर चौकात गोळ्या घालण्यापेक्षा कायदेशीर "फाशी"...आपण काय ठरवणार...काळच...ठरवेल..!!

एक मात्र खरं...
आपल्यातील संवेदनाशील माणूसपण आपण जपलं पाहिजे आणि ते  इतरांमध्ये रुजवताही आलं पाहिजे..!!

© डॉ गणेश मुडेगावकर

Share