जलक्रांतीची" सुरुवात महाराष्ट्रामधून..!!
© प्रा. डॉ.गणेश मुडेगावकर
(9370440940)
हरितक्रांती, धवलक्रांती आणि संपूर्ण भारतास आदर्शवत ठरावी अशी ही राजकारण विरहित जनसहभागातून उभारलेली *जलक्रांती*..!!
......अस म्हणतात की तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी किंवा पाण्यामुळे होईल परंतु जर एखादया प्रश्नावरती जर सर्व समाज एकत्र आला तर त्याचे लोकसहभागमधून...लोकचळवळीमध्ये कसे रूपांतर होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे *"सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018".*
*पाणी फाउंडेशन*, *भारतीय जैन संघटना , *ज्ञान प्रबोधिनी* *मानवलोक* आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सलग तिसऱ्या वर्षी *8 एप्रिल ते 22 मे 2018* दरम्यान दुष्काळाची दोन हात करावयाचे ठरवले.
*24 जिल्हे,* *75 तालुके* आणि *4025 गावं* ...आणि *20,000* पेक्षा अधिक *प्रशिक्षित कार्यकर्ते* ....या सर्वानी एकत्रित येऊन पाहिलेले एकमेव स्वप्न...आपलं गाव टँकरमुक्त, दुष्काळमुक्त आणि पाणीदार करायाचंच..!!
भारतीय जैन संघटनेच्या आदरणीय *श्री शांतीलालजी मुथा* यांच्या प्रेरणेमधून आणि मार्गदर्शनानुसार *श्री संतोषजी कुंकुलोळ*, *श्री धनराजजी सोळंकी*, *श्री निलेशजी मुथा* *श्री अविनाशजी मुडेगावकर* आणि त्याच्या *BJS अंबाजोगाई* टीमने हे कार्य *"अंबाजोगाई तालुक्यामध्ये"* हाती घेतले.
या *BJS टीम* सोबत या "वॉटर कप 2018" स्पर्धेच्या कार्याचा आढावा घेत असतानाचे अनूभव खूपच भारावून टाकणारे आणि चकित करणारे होते....
यातीलच हे काही *बोलके अनुभव* .....
# किमान तीन किलोमीटर अंतराहून आम्ही पाणी आणत होतो..मागील दोन वर्षात ही परिस्थिती बदलली आहे..!!
#आम्ही ऊसतोड कामगार...6 महिने उसतोडीसाठी गावाबाहेर आणि 6 महिने गावात...त्यात ही पाणी टंचाई...उन्हाळ्यात गावात राहणे अवघड झाले होते..पण मागील वर्षी पासून खूपच फरक पडला आहे..!!
#आमच्या गावातील महिलांनी ठरवलं की आपल्याला जे इतर ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागते ती वेळ पुढच्या पिढीवर येऊ द्यायची नाही..!!
#लोक म्हणतात... *अठरा पगड जाती* ...आमच्या गावात *तेवीस वेगवेगळ्या जाती जमातीचे* लोक एकत्र राहतात... परंतु त्यातही प्रचंड राजकारण.... पण या "पाण्यामुळे" एकमेकांचे तोंड न पाहणारी लोक देखील खांद्याला खांदा लावून काम करत होती..!!
#महिला काय करू शकतात ? याचं हे एक उदाहरण..एका गावामध्ये अचानक लोकवर्गणीतून जमा करूनही..डिझेल ची कमतरता भासू लागली...गावातील चारशे महिलांनी प्रत्येकी एक लिटर डिझेलची रक्कम जमा करुन अवघ्या काही क्षणात प्रश्न सोडवला..!!
#पोहत असताना एक 12 वर्षीय मुलाचे दोन्ही हात मोडले..गाव गोळा झालं..पोराचा बाप म्हटला... आजिबात कुणीही काम बंद करू नका मी जाऊन याचे उपचार पूर्ण करतो...दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती कामावर हजर..!! आणि....दोन दिवसानंतर..दोन्ही हात गळ्यात बांधून मुलगाही..!!
#अचानक गावा मधील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू...क्रियाकर्म पूर्ण करून अख्खा गावं.. श्रमदानाला..!!
#रमजानचा महिना सुरू आहे...रोजा ठेऊन सुद्धा आम्ही श्रमदानामध्ये कुठेही माग पडलो नाहीत..!!
#बक्षीस नाही मिळाले तरी हरकत नाही पण आमचं पावसाचं पाणी आम्ही असं वाहून जाऊ देणार नाही..!!
महाश्रमदान हा एक त्याचाच भाग...यासोबतच काही नवीन बाबी निदर्शनास आल्या त्यातील एक
संकल्पना..
# *गावजावाई* म्हणजेच त्यादिवशी सर्व श्रमकर्यांना नाश्ता आणि चहा त्या जावायकडून..असे 45 दिवसही निश्चित..!!
गावाला दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सकाळ संध्याकाळ श्रमदान..शेवटच्या 4 ते 5 दिवसात तर कामाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना "चूल बंद औतन" म्हणजेच सर्व जेवणाची जबाबदारी ही गावाची..!!
वॉटर कप 2018 स्पर्धेमध्ये विविध निकषांच्या आधारे गावाची *100 गुणांची परीक्षा* या मध्ये 13 पेक्षा अधिक निकष...परीक्षण अत्यंय काटेकोर असणार.
यामध्ये गावं श्रमदानाला तयार होत परंतू अडचण होती ती *मशीन कामाची...!!* कारण *30 पेक्षा अधिक गुण* केवळ या वरती अवलंबून होते.
*भारतीय जैन संघटनेने* हा प्रश्नच सोडवून टाकला आणि 27 पोकलैन मशीन अंबाजोगाई तालुक्यातील गावासाठी उपबद्ध करून दिल्या.
गावकर्यांनीही लोकवाट्यामधून (वर्गणी) या मशीन 30 दिवस ते 45 दिवस कशारीतीने वापरता येत याचे नियोजन केले. यातही जर डिझेलची कमतरता जिथे जिथे जाणवली तिथे BJS अगदी खंबीरपणे गावकऱ्यांसोबत उभी राहिली.
या सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 1700 पोकलेन मशीन BJS मार्फत देण्यात आल्या. BJS मार्फत *बुलढाणा* जिल्हा दत्तक घेण्यात आला. हे 45 दिवस 250 पेक्षा अधिक पोकलेन या ठिकाणी सुरू असणार आहेत.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली गावं पाहून पुढील वर्षी नवीन गावांचा सहभाग अधिक प्रमानात असणार हे मात्र निश्चित..!!
पाणी फौंडेशन चे सर्व प्रशिक्षित सहकारी, मुख्यमंत्री जलदूत, गावातील प्रशिक्षण घेतलेले गावकरी यांच्या मुळे शास्त्रीय दृष्टया शास्वत पाणी साठवण आणि स्पर्धा निकष याकडे प्रत्येकजण आपापल्या परीने लक्ष देत होता. महत्वाची बाब म्हणजे यातील प्रत्येक बाब, निकष प्रत्येक गावकऱ्यांना माहीत होतं हे विशेष..!!
"पाणीदार गाव ते पाणीदार महाराष्ट्र" हे स्वप्न सत्यात उतरत असताना आपण त्याचा एक भाग होतो, साक्षिदार होतो...हे समाधान.. नक्की प्रत्येक घटकाला वाटेल यात आजीबात शंका नाही.
*राव न करी ते गाव करी..!!* या उक्तीची प्रचिती आपणास...या ग्रामस्थांच्या मेहनतीमधून याची देही याची डोळा अनुभवास मिळत होती..!!
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या *जलक्रांतीची* नोंद ही सुवर्णाक्षरांनी केली जाईल हे मात्र नक्की.
भविष्यात देखील ही प्रेरणा सर्वांना पाणीदार...गावं, तालुका, जिल्हा...पर्यायाने पाणीदार महाराष्ट्र..करण्यास मदत करेल...हे मात्र निश्चित...!!
#पाणी_फौंडेशन
#सत्यमेव_जयते_वॉटर_कप_स्पर्धा_2018
#भारतीय_जैन_संघटना
Share
🙌🙌🙌🙌👍👍👌👌
ReplyDeleteThank you..!!
Deleteखूप सुंदर...💐
ReplyDeleteThank you..!!
ReplyDelete