#स्पर्धा_पाहिलेला_माणूस

नाटक (१)* : राहिले दूर घर माझे
लेखक : शफाअत खान

आज स्पर्धेचा पहिला दिवस..शफाअत खान यांच नाटक...कारणही तसंच "शोभायात्रा" नाटकाचं गारुड अजून ही उतरलेले नाही..!!

फाळणी..!!
दोन देश, दोन धर्म आणि एक चिरंतन संघर्ष..!
फाळणी मुळे स्वतःचा 'देव', 'देश' आणि 'धर्म'  ऐका रात्रीत पोरका होतो,
डोळ्यासमोर उभा संसार बेचिराख होतो,
आणि या सोबतच
अनन्वित अत्याचाराला बळी पडलेले दोन्ही धर्मातील लोक..!!
खरं तर फाळणीमधील प्रत्येक व्यक्तीच्या वेदनेवरती एक स्वतंत्र कथा, कादंबरी किंवा नाटक होऊ शकते.

कथासूत्र:
एक वृद्ध स्त्री , ती ही पाकिस्तान मधे..!!
स्वतः च्या हवेली मध्ये शेवटची वारसदार आणि तिच्या धर्माची शेवटची प्रतिनिधी. मुस्लिम समाजातील कुटूंबास आश्रय आणि त्यामधून सुरू होतो संघर्ष...दोन धर्मांमध्ये...कधी उत्सव साजरे करण्यावरून तर कधी अस्तित्वावरून..!!
भावलेले पात्र म्हणजे..
'शायर' हाच काय तो अस्सल..निर्भीड..!
कलेमधून माणुसकी आज ही जिवंत आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण..!!
आपल्या संस्कारामधून आपण नवीन पिढी देखील तेवढीच कणखर घडवू शकतो हे संदेश देणारे हे नाटक.

71 वर्षांनंतर देखील ही जखम ताजी आहे.
खुशवंत सिंग, भीष्म सहानी, साहिर, अमृता प्रीतम आणि नवीन पिढीचे शफाअत खान यांना आजही ती वेदना का जगावी आणि सर्वांसमोर आणावी लागली हा खरा प्रश्न.

मानवी इतिहासामध्ये सर्वात जास्त रक्तपात हा स्वतःहाचा धर्म किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठीच झाला आहे, याचंच आणखी एक उदाहरण..!!

दुभंगलेले मन , चिरंतन वेदना आणि खरच फाळणी का झाली..?
ही रक्तरंजित दुही टाळता आली असती का ?
आजही विस्थापितांचे प्रश्न सुटले का?
55 कोटी, हत्या की वध ?
हे आणि असे असंख्य प्रश्न घेऊन प्रेक्षागृहा बाहेर पडतो प्रेक्षक..!!

© डॉ गणेश मुडेगावकर

Share