निर्पेक्षता का काय ते..!!
हे "निर्मिका.."
आज काल समाजभान
राखताना थोड़े
अवघडल्या सारखे होते...
परखड मत मांडावे
तर तुम्ही "फलान्या डीमक्याचे"
समर्थक..
असा शिक्का...
बर नाही बोलावे तर..
"मुर्खांची वाचाळता"
आणी
"बुद्धिवंतांची निष्क्रियता"
असा शिक्का..
बर "बुद्धिप्रामान्य"
आणि "वाद"
या एकाच नाण्याच्या दोन बाजू
.
.
"जात"
"धर्मं"
ही पण
कुणा
एकाची "स्व निर्मितीच नाही का?"
.
.
हे "निर्मिका"
मग ही
"धर्म्नाध" ,"धर्मनिर्पेक्षता"..
.
.
भानगड
एकदा तूच का मिटवून टाकत नाही...
.
.
बघ नाहीतर
तूझा पण
.
.
.
"वध" नाहीतर "खून" व्हायचा..
.
.
नाही पुन्हा म्हणशील
.
.
मी सांगितले नाही म्हणून..!!
.
.
© गणेश मुड़ेगांवकर
Share
No comments:
Post a Comment