राजे...
'सत्तासुन्दरी'आणी 'मतदार'
यांचामधे आमचा राजा 'मदमस्त' आहे,
बळीराजा रोज करतो आत्महत्या
आणि
सत्तेच्या सारीपाटात सारी सरदार मंडळी व्यस्त आहे..!!
.
.
राजे
"देठालाही धक्का लावायचा नाही"
हा कायदा अगदी तंतोतंत पाळला जातो...
'आशा' तर सोडा...
जगण्याची 'उमेद' सुद्धा मुळापासून
खुडून टाकली जाते..!"
.
.
राजे ..
दुष्काळ ही तर 'संधी'असते..
बाज़ार मरणाचा...
"मडयावरच लोनी खायची"
ही सर्वात मोठी महपर्वनि असते..!!
.
.
राजे..
मला आता भीती वाटते तुम्हाला 'आपला" म्हणायला..
कारण..
अनुयायी आता माझी "जात" विचारतात अणि मग 'महापुरुष'..
.
.
.
राजे..
तुम्ही मला भेटला होता..
रायगडावर..
माँ साहेबान बरोबर..
.
.
हतबल..
निराश...
विचारमग्न..!!
.
..
नतमस्तक मी...धारातीर्थी..
.
.
तानाजी सोबत..!!
© गणेश मुड़ेगावकर
Share
No comments:
Post a Comment