#जारव्याचा जंगलातून
#तीन अंकी नाटक
#लेखक: आनंद खरबस
#दिग्दर्शन : अमोल देशमुख
#प्रकाश योजना : गणेश मरोड
#नेपथ्य : डॉ गणेश मुडेगावकर
#संगीत: अद्वैत कुलकर्णी

काय_आहे_जारव्याच्या_जंगलातून_तीन_अंकी_नाटक_?

याचा शोध घेण्यासाठी हा लेखन प्रपंच....!!

थोडक्यात सांगायचे झाले तर.....
कथा आपणास माहिती आहेच...तरीही... हे कथासूत्र...

"अंदमान....काळ्या पाण्याची शिक्षा , गुन्हेगार , काळ्या पाण्याची कठोर शिक्षा...तुरुंगवास आणि तिथून पळून जाऊन... जंगलात येऊन जारवा जमातीच्या मदतीने....हिंदुस्थानात परत जाण्याचा प्रयत्न....!!"

*"मागील 20 ते 25 वर्षांच्या राज्य नाट्य स्पर्धेतील विविध संकेतातून आणि मानदंड मोडणारे ठरले"*

ते कसे ?

मुळातच....

1. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या सिद्धहस्त लेखणी म्हणजे धगधगता ज्वालामुखी...त्याला कोणी हात लावण्यास धजावत नाही....पण आपण सर्वांनी तो शिवधनुष्य आपण पेलण्याचा... पूर्ण प्रयत्न केला... नव्हे पेलला.

2. रंगमंच वापराचे रूढ संकेत, पद्धती आपण मोडीत काढले...

3. प्रकाश योजना हो कायम पहिल्या काठी (बार) वरून होते....या संकल्पनेलाच आपण इथेही छेद दिला.

4. नेपथ्यामध्ये आपण मंदिर, न्यायालय, तुरुंग इ. बाबी केवळ काही साधनांच्या मदतीने उभे केले.
जंगल म्हटले की झाड, झुडूप इ. बाबी परंतु केवळ लेव्हल्स च्या मदतीने आणि (backdrop) बॅक ड्रॉप च्या मदतीने आपण संपूर्ण जंगल उभे केले. आणि सर्वात महत्वाची बाब आपण नेपथ्य ही कोना एकाची जबाबदारी आहे न समजता सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी मिळून तयार केले.

5. नव्वद टक्के अभिनय आणि 10 टक्के तांत्रिक बाजू...पण तीही भक्कम...हा निकष आपण नाट्य सादरीकरण करताना पाळला.

6. फक्त 4 अनुभवी कलावन्त बाकी सर्व टीम (तब्बल 16 ते 18 कलावन्त) नवीन तरीही बेमालूट सादरीकरण.....कदाचित हे ही सलत असावे...

7. संगीतामध्ये असणारी नाविन्यता...1910 चा काळ उभा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाजू संगीताच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पद्धतीने टिपल्या होत्या..

8. वेशभूषा करत असताना टिपलेले बारकावे, घेतलेली मेहनत...अगदी तेच पात्र पुढील प्रवेशात आहे हे देखील " सुमार" लोकांच्या लक्षात आले नाही...

9. रंगभूषाकारांनी प्रत्येक पात्र अगदी रेखीव रित्या  जिवंत केले आहे. कंटक ते डोकाटी आणि योगानंद ते जारवा जमात....एक जारवा तयार होण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिट एवढा वेळ घेत होता...

10. दिग्दर्शक म्हणून केलेले विविध रंगमंचीय  प्रयोग...न्यायालय, तुरुंग, तिकडी ते जारवा जमात त्यांच्या रूढी, परंपरा, त्यांची स्वतंत्र भाषा आणि या सर्व बाबींमध्ये असणारी सर्जनशीलता कदाचित यांच्या कल्पनेच्या पलीकडची असेल....

11. तीन अंकी नाटक तेही पहिलं सादरीकरण आणि एवढं सगळं.......आणि उत्तमरीत्या स्पर्धेत सर्वांच्या नाकावर टिच्चून सादर झाले आहे म्हटल्यावर....!!!

जेवढे जास्त प्रश्न, चर्चा...टिका तेवढी यशाची खात्री अधिक...!!

......मित्रहो आपण आपली रेषा खूप मोठी ओढून ठेवली पाहिजे.......त्यापेक्षा मोठी रेषा ओढ्यान्याच्या भीतीने कदाचीत...........उत्तम सादरीकरण होतील किंवा....

(हे सर्व एवढ्या अनुभवी, अभ्यासू समीक्षक काय ते....😜 "लोकांना" कसे दिसले नसेल....?
बरं हे लोक्स असे लिहिणार असतील तर प्रेक्षकांना पुढच्या प्रयोगासाठी कसे आकर्षित करणार..!!😊 ...असो..!!)

....श्री नटेश्वर त्याना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना...

बाकी पुढचा प्रयोग आपल्या शुभेच्छांसह जबरदस्त रित्या सादर करू...😁✌

© डॉ. गणेश मुडेगावकर

Share