नाटक : व्हॉट वुई आर ?
लेखिका आणि दिग्दर्शक : विद्या काळे
संस्था: श्रुती मंदिर, सोलापूर

माणूस की अमानुष : व्हॉट वुई आर ?
Lokmat Epaper Link : Click on it..
हजारो वर्षे निसर्गाशी संघर्ष करून मानवाने आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवलं आहे. हा संघर्ष आजही सुरू आहे. संकटं कधी नैसर्गिक तर कधी मानव निर्मित. युद्ध देखील याचीच परिणीती. युद्ध दोन राष्ट्रांमध्ये होते संपतो तो माणूस, मरते ती माणूसकी. युद्धात हेलिकॉप्टर कोसळून हिमशिखरावर आपल्या सहकाऱ्यांसह सहा ते सात  दिवस अस्तित्व कसं टिकवणार ? हा खडतर प्रवास आपण अनुभवतो "व्हॉट वुई आर ?" या विद्या काळे लिहीत नाट्यकृतीमधे. 

फ्रांडोसा आपल्या भविष्याची स्वप्न डॉ. सफायर सोबत पाहतो आहे. दोघेही भारतीय सैन्या आणि युद्ध प्रसंगांमध्ये गुंतलेले. हे स्वप्न युध्दजन्य परिस्थितीत पुढे जाणार असे वाटत असतानाच हेलिकॉप्टर कोसळते. स्वतःला हिमशिखरावर जिवंत ठेवण्यासाठी फ्रांडोसा जॉन चे मांस खातो. फ्रांडोसा नरभक्षक आहे हे ठरवून सर्वजण मोकळे होतात. सफायर फ्रांडोसाला नकार देते. नकार, घृणा, तिरस्कार या वेदना सहन करण्यासाठी आपण जिवंत राहिलो का असा प्रश्न फ्रांडोसाला पडतो. अस्तिव टिकवण्यासाठी मी जर एक अपरिहार्य चूक केली असेल तर मी आयुष्यभरासाठी चुकलो ? मग आपण कोण? व्हॉट वुई आर?

फ्रांडोसा (मुकेश जमादार) यांनी सैनिक उत्तम रित्या साकारला, डॉ. सफायर (निवेदिता देशपांडे) ही भूमिका प्रभावशाली झाली, देसाई (चिदंबरप्रसाद अक्कल), रोड्रिक्स (ओंकार कोप्पा), बहादूर ( शुभम दोडतले) यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. 
बहादूर ( शुभम दोडतले)स्वीटी (इरा तंबाके),  मिस्च्युवस बॉय (जकी शेख) यांच्या छोटेखानी भूमिका भाव खाऊन गेल्या. 

नेपथ्यामध्ये वेणूगोपाल धोत्रिकर यांनी नेमकेपणा साधला होता, प्रकाश योजना करत असताना दीपक शिंदे यांनी हेलिकॉप्टर प्रसंग, नर मांस भक्षण प्रसंग अधोरेखित केले, जैद शेख यांचे संगीत संहितेस पूरक होते, वेशभूषा प्रज्ञा केकडे, रंगभूषा ओमप्रकाश श्रावण यांनी तांत्रिक बाजू  योग्य रित्या सांभाळल्या. 

सैनिकांच्या जीवनाचा खडतर प्रवास 
अधोरेखित करणारा व्हॉट वूई आर हा प्रयोग व्यवस्थितरित्या सादर झाला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share