इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती: 
---
१. प्रवेश प्रक्रिया:
• महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (कला, वाणिज्य, विज्ञान) इ. ११ वीचे प्रवेश १० वी च्या गुणवत्तेवर आधारित आणि पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होतात.
•प्रवेश Merit Based (गुणांनुसार) असतो.
•व्यवस्थापन, इनहाऊस (स्वतःच्या शाळेतील), अल्पसंख्याक, सामाजिक आरक्षण इत्यादी कोट्यांमध्ये वेगळ्या अटी लागू होतात.
---
२. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे टप्पे:
(क) माहिती संकलन व महाविद्यालय नोंदणी:
८ ते १६ मे २०२५ दरम्यान सर्व शाळा/महाविद्यालयांनी स्वतःची व अभ्यासक्रमांची माहिती प्रवेश पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक.
(ख) विद्यार्थी नोंदणी:
१९ ते २८ मे २०२५: विद्यार्थी त्यांचे ऑनलाईन खाते तयार करून, सर्व माहिती भरतात.
त्यानंतर, शाळेने त्यांच्या फॉर्मची पडताळणी करावी लागते.
(ग) पसंतीक्रम भरने:
विद्यार्थी किमान १ आणि कमाल १० पर्याय (महाविद्यालय + शाखा) पसंतीने भरू शकतात.
---
३. प्रवेश फेऱ्या (Rounds):
(i) शून्य फेरी (Zero Round):
इनहाऊस, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक संस्था यांच्यासाठी आहे.
या फेरीत मिळालेला प्रवेश अंतिम असून विद्यार्थ्याला मुख्य फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.

(ii) गुणवत्ता आधारित फेर्‍या:
प्रथम फेरी: सर्वात जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीनुसार प्रवेश.
जर विद्यार्थ्याला पहिल्याच पसंतीने प्रवेश मिळाला आणि तो घेतला नाही, तर पुढच्या फेर्‍यांसाठी तो अपात्र ठरतो.
द्वितीय, तृतीय व चतुर्थ फेरी: उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश.

(iii) OPEN FOR ALL फेरी:
सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली.
कोणताही कोटा लागू नाही; रिक्त जागांवर थेट प्रवेश.
---

४. वेळापत्रक (Indicative):
• शाळा व महाविद्यालय नोंदणी: ८ ते १६ मे २०२५
• विद्यार्थी अर्ज प्रक्रिया: १९ ते २८ मे २०२५
• शून्य फेरी: जून पहिल्या आठवड्यात (तारीख निश्चित नाही)
•गुणवत्तानुसार फेर्‍या: जून- जुलै महिन्यात
•OPEN FOR ALL फेरी: जुलैच्या शेवटी
•वर्गाची सुरुवात: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात
---

५. महत्त्वाच्या सूचना:
•सर्व प्रवेश ही ऑनलाईन प्रणालीद्वारेच होतील. ऑफलाईन प्रवेश मान्य नाही.
•विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात वेळेत प्रवेश घ्यावा.
•कोट्यांतील जागा भरल्यानंतर उर्वरित रिक्त जागा सामान्य फेर्‍यांमध्ये जोडल्या जातील.
•प्रवेश घेतल्यावर तो Final Admission म्हणून समजला जातो.

Share